S M L

तूर विकायची कशी ?, बळीराजा हैराण

व्यापारी ४ हजार रुपये प्रति क्विंटल भावाने खरेदी करत होते. तर शासन ५ हजार रुपये प्रति क्विंटलने खरेदी नाफेडच्या माध्यमाने करतंय

Sachin Salve | Updated On: Apr 22, 2017 05:10 PM IST

तूर विकायची कशी ?, बळीराजा हैराण

22 एप्रिल : हिंगोली जिल्ह्यात यावर्षी तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झालंय. त्यामुळे तुरीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली होती. तुरीचं उत्पादन चांगलं होऊन सुद्धा शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू नाही तर चिंता दिसतेय.

व्यापारी ४ हजार रुपये प्रति क्विंटल भावाने खरेदी करत होते. तर शासन ५ हजार रुपये प्रति क्विंटलने खरेदी नाफेडच्या माध्यमाने करतंय.  मात्र शासनाने घोषणा जरी केली असली तरी नाफेड खरेदी करत नव्हतं. अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांची तूर पडून आहे.

फक्त तीन दिवसांसाठी नाफेडने पुन्हा तूर खरेदी सुरू केलीय. .विशेष म्हणजे जी तूर सध्या गोदामात पडून आहे त्याच तुरीची खरेदी करण्यात येणार आहे. नवीन येणाऱ्या तुरीची खरेदी करण्यात येणार नसल्याने शेतकरी अडचणीत सापडलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 22, 2017 05:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close