S M L

परब यांच्याकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

Sachin Salve | Updated On: Nov 27, 2013 10:20 PM IST

Image img_239382_rrpatil34_240x180.jpg27 नोव्हेंबर : राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील लिखानामुळे एका वादात अडकले आहे. शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी राज्यपालांना पत्र लिहून गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

आर.आर. पाटील यांनी एका दिवाळी अंकात 'ऑपरेशन एक्स' नावाचा लेख लिहिलाय. या लेखात त्यांनी अतिरेकी अजमल कसाब याला फाशी दिल्यानंतर येरवडा जेलमध्ये अंतिम क्रियाकर्म कसे केले गेले आणि ते कुणी केलं याची गोपनीय माहिती त्यांनी या लेखात उघड केली आहे.

त्याबरोबरच कसाबचं जेलमध्ये हिंसक वागणं कसं होतं याबाबतही त्यांनी माहिती उघड केली आहे. येरवडा जेलमधल्या एका कर्मचार्‍याच्या मौलवी मुलानं हे अंतिम क्रियाकर्म केल्याची माहितीही त्यांनी उघड केली आहे. या कारणामुळे त्यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी अनील परब यांनी राज्यपालांकडं केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 27, 2013 10:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close