S M L

शरद पवारांनी ललित मोदी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला- निरूपम

Sachin Salve | Updated On: Jun 18, 2015 11:49 PM IST

567sanjay_nirupam3418 जून : ललित मोदी प्रकरणी काँग्रेसनं आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आरोप केलाय. शरद पवार हे ललित मोदी आणि सुषमा स्वराज यांचं मदत प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते संजय निरुपम यांनी केलाय.

मुंबईत पत्रकार परिषद घेऊन निरुपम यांनी खुलासा केलाय. ललित मोदींनी सर्व मेल्स शरद पवारांनाही केले होते असं सांगत, या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करा अशी मागणी निरूपम यांनी यावेळी केलीये.

दरम्यान, ललित मोदी प्रकरणावरून सुषमा स्वराज वादाच्या भोवर्‍यात सापडल्या असतानाच, या प्रकरणी आरएसएसनं नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या वादामुळे भाजपमध्ये दुफळी असल्याचं समोर आलंय. त्यामुळे भाजपच्या प्रतिमेला तडा गेल्याचं संघाचं म्हणणं आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 18, 2015 11:49 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close