S M L

भूखंड प्रकरणी सेनेनं फोडलं पालिका प्रशासनावर खापर !

Sachin Salve | Updated On: Jan 19, 2016 10:21 PM IST

भूखंड प्रकरणी सेनेनं फोडलं पालिका प्रशासनावर खापर !

मुंबई-19 जानेवारी : मुंबईतल्या मोकळ्या भूखंडांच्या वादग्रस्त प्रस्तावाला आता वेगळंच वळण लागलंय. अडचणीत सापडलेल्या सत्ताधारी शिवसेनेने अखेर पालिका प्रशासनावर खापर फोडण्याची रणनीती स्वीकारली आहे. एकीकडे सेनेच्या तृष्णा विश्वासरावांनी प्रशासनावर थेट आरोप केले तर युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंनी आयुक्तांना पत्र लिहून वादग्रस्त नियमांपासून अंतर राखायचा प्रयत्न केला.

चहू बाजूंनी टीकेची झोड उठल्यानंतर.. अखेर.. मोकळे भूखंड परत करा, अशा नोटिसा बीएमसी प्रशासनाने नेत्यांना पाठवायला सुरुवात केली. या यादीत नाव आहे शिवसेनेच्या सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांचं. पण मला भूखंड मिळालाच नव्हता.. मग नोटिशींच्या यादीत माझं नाव का ? असा सवाल त्यांनी विचारलाय. पालिका प्रशासन जाणीवपूर्वक सेनेला बदनाम करतंय, असं म्हणत त्यांनी या वादाला नवं वळण लावलंय.

तृष्णाताईंनी पालिका प्रशासनावर थेट हल्ला केल्यानंतर थोड्याच वेळात आदित्य ठाकरेंनीही आयुक्तांना पत्र लिहिलं आणि वादग्रस्त नियम बदलण्याची मागणी केली.

बॉल ढकलला आयुक्तांच्या कोर्टात?

मला वाटतं की (भूखंड दत्तक) धोरण चांगलं आहे. त्यामुळे मोकळ्या भूखंडांवर अतिक्रमणं टाळता येतील. तसंच मैदानांच्या देखभालीत

लोकसहभागही वाढवता येईल. पण वाटतं आपण यो धोरणात दोन बदल करावे. गोंधळात टाकणाऱ्या नियमामुळे नागरिकांना चिंता वाटते की दत्तक घेणारी संस्था भूखंडाचा पैसे कमावण्यासाठी वापर करेल आणि नंतर तो गिळंकृत करेल.

आधी धोरण मंजूर करायचं..।आणि वाद झाल्यानंतर वादग्रस्त नियमांपासून अंतर राखत..।प्रशासनावर खापर फोडायचं.. अशी सेनेची रणनीती आहे का ? असा प्रश्न विरोधक विचारतायत. मनसेने तर 216 भूखंड मिळवणा-या सर्व नेत्यांची यादी वेबसाईटवर टाकलीये..

आयुक्तांवर आरोप करून...शिवसेना अप्रत्यक्षपणे राज्यातल्या सत्ताधारी भाजपवर आरोप करतंय का, हाही प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे ही लढाई पुन्हा सेना विरुद्ध भाजप अशीच होताना दिसतेय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 19, 2016 09:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close