S M L

जात पडताळणी प्रमाणपत्र 6 महिन्यांत देणे बंधनकारकच : हायकोर्ट

Sachin Salve | Updated On: Dec 9, 2016 06:37 PM IST

mumbai high court43409 डिसेंबर : निवडणुका, सरकारी नोक-या, शिक्षण आदींमध्ये आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर जात पडताळणी प्रमाणपत्र सहा महिन्यांत देणे हे बंधनकारकच आहे असा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई हायकोर्टाने दिलाय.

राज्य सरकारने या दृष्टीने कायदा दुरुस्तीद्वारे केलेली तरतूद बंधनकारक की दिशानिर्देशक, या कायदेशीर मुद्द्यावर न्या. अभय ओक, न्या. एम. एस. सोनक आणि न्या. अजय गडकरी या तीन न्यायमूर्तीच्या पीठाने आज हा निर्णय दिला.

पुणे जिल्ह्यातील भोर नगरपालिकेत निवडून आलेल्या नगरसेविकेने सहा महिन्यांनंतर जात पडताळणी प्रमाणपत्र दिलेले असूनही त्यांना प्रशासनाने अपात्र ठरवले नसल्याने अनंत उन्हाळकर यांनी हायकोर्टात याचिका केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 9, 2016 05:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close