S M L

सीएसटी परिसरात हिंसाचारामध्ये 2 ठार

11 ऑगस्टमुंबईतील मुख्य रेल्वे स्थानक छत्रपती शिवाजी टर्मिनल (सीएसटी) परिसरात आसाममध्ये झालेल्या दंगलीच्या विरोधात काढण्यात आलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले. जमावाने तुफान दगडफेक करत वाहनाची तोडफोड,जाळपोळ केली या घटनेत 2 जण ठार झाले असून 10 जण जखमी झाले आहे. या दगडफेकीत 12 पोलीस किरकोळ जखमी झाले आहे. जखमींवर नजीकच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. आता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आली आहे.आज दुपारी 2:30 च्या सुमाराला सीएसटी परिसरात आसाममध्ये झालेल्या दंगलीचा विरोध करण्यासाठी रजा अकादमी संघटनेच्या वतीने हा निषेध मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा आझाद मैदानाकडे निघाला होता. पण या मोर्च्यातील जमाव आक्रमक होत जोरदार दगडफेक केली, वाहनाची तोडफोड सुरु केली. पोलिसांच्या आणि बेस्टच्या बसेसला आग लावण्यात आली. तीन चॅनेलच्या ओबी व्हॅनला पेटवून देण्यात आले. पोलिसांनी जमावाला आवर घालण्याच प्रयत्न केला असता जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांच्या वाहनांची तोडफोड करुन आग लावण्यात आली. जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या असून हवेत गोळीबारही करावा लागला. पोलिसांनी घटनास्थळाचा ताबा घेतला आहे. परिस्थिती नियंत्रणात असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका,शांतता राखा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. या तोडफोडीचा लोकलवर परिणाम झाला नाही याबद्दल रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे सुरुळीत सुरु असल्याचं सांगण्यात येतं आहे. गृहमंत्री आर.आर. पाटील आपला सांगलीवरचा दौरा अर्धवट सोडून मुंबईकडे निघाले आहे. परिस्थिती नियंत्रणात आली असून ज्या जमावाने तोडफोड केली. त्यांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, भाजपाचं शिष्टमंडळ रविवारी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. घटनेच्या चौकशीसाठी सर्वपक्षीय समिती नेमावी अशी त्यांची मागणी आहे. त्याचबरोबर पत्रकारांना 100 टक्के नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुणगंटीवार यांनी केली आहे. तोडफोडीत नुकसान- 10 बेस्ट बसेसची तोडफोड- 3 न्यूज चॅनेलच्या 'ओबी व्हॅन'(आऊट डोअर ब्रॉडकास्टिंग व्हॅन)ची तोडफोड, व्हॅनला लावली आग- पोलिसांच्या गाड्याची तोडफोड, मोठी व्हॅन पेटवली- स्टेशनच्या बाहेरील वाहनांची तोडफोड, अनेक गाड्यांची तोडफोड या तोडफोडीचा लोकलवर परिणाम झाला नाही याबद्दल रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे सुरुळीत सुरु असल्याचं सांगण्यात येतं आहे. गृहमंत्री आर.आर. पाटील आपला सांगलीवरचा दौरा अर्धवट सोडून मुंबईकडे निघाले आहे. परिस्थिती नियंत्रणात आली असून ज्या जमावाने तोडफोड केली. त्यांचा शोध घेतला जात आहे.संबंधित बातम्यासीएसटी परिसरात तोडफोड,जाळपोळ (व्हिडिओ) आसाम पाचव्या दिवशीही धुमसतंय, 44 जणांचा मृत्यू (आजचा सवाल) आसाममधील हिंसाचार रोखण्यात गोगोई सरकारनं चालढकल केली आहे का?

आईबीएन लोकमत | Updated On: May 11, 2013 11:21 AM IST

सीएसटी परिसरात हिंसाचारामध्ये 2 ठार

11 ऑगस्ट

मुंबईतील मुख्य रेल्वे स्थानक छत्रपती शिवाजी टर्मिनल (सीएसटी) परिसरात आसाममध्ये झालेल्या दंगलीच्या विरोधात काढण्यात आलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले. जमावाने तुफान दगडफेक करत वाहनाची तोडफोड,जाळपोळ केली या घटनेत 2 जण ठार झाले असून 10 जण जखमी झाले आहे. या दगडफेकीत 12 पोलीस किरकोळ जखमी झाले आहे. जखमींवर नजीकच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. आता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आली आहे.

आज दुपारी 2:30 च्या सुमाराला सीएसटी परिसरात आसाममध्ये झालेल्या दंगलीचा विरोध करण्यासाठी रजा अकादमी संघटनेच्या वतीने हा निषेध मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा आझाद मैदानाकडे निघाला होता. पण या मोर्च्यातील जमाव आक्रमक होत जोरदार दगडफेक केली, वाहनाची तोडफोड सुरु केली. पोलिसांच्या आणि बेस्टच्या बसेसला आग लावण्यात आली. तीन चॅनेलच्या ओबी व्हॅनला पेटवून देण्यात आले. पोलिसांनी जमावाला आवर घालण्याच प्रयत्न केला असता जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांच्या वाहनांची तोडफोड करुन आग लावण्यात आली. जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या असून हवेत गोळीबारही करावा लागला. पोलिसांनी घटनास्थळाचा ताबा घेतला आहे. परिस्थिती नियंत्रणात असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका,शांतता राखा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. या तोडफोडीचा लोकलवर परिणाम झाला नाही याबद्दल रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे सुरुळीत सुरु असल्याचं सांगण्यात येतं आहे. गृहमंत्री आर.आर. पाटील आपला सांगलीवरचा दौरा अर्धवट सोडून मुंबईकडे निघाले आहे. परिस्थिती नियंत्रणात आली असून ज्या जमावाने तोडफोड केली. त्यांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, भाजपाचं शिष्टमंडळ रविवारी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. घटनेच्या चौकशीसाठी सर्वपक्षीय समिती नेमावी अशी त्यांची मागणी आहे. त्याचबरोबर पत्रकारांना 100 टक्के नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुणगंटीवार यांनी केली आहे.

तोडफोडीत नुकसान

- 10 बेस्ट बसेसची तोडफोड- 3 न्यूज चॅनेलच्या 'ओबी व्हॅन'(आऊट डोअर ब्रॉडकास्टिंग व्हॅन)ची तोडफोड, व्हॅनला लावली आग- पोलिसांच्या गाड्याची तोडफोड, मोठी व्हॅन पेटवली- स्टेशनच्या बाहेरील वाहनांची तोडफोड, अनेक गाड्यांची तोडफोड

या तोडफोडीचा लोकलवर परिणाम झाला नाही याबद्दल रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे सुरुळीत सुरु असल्याचं सांगण्यात येतं आहे. गृहमंत्री आर.आर. पाटील आपला सांगलीवरचा दौरा अर्धवट सोडून मुंबईकडे निघाले आहे. परिस्थिती नियंत्रणात आली असून ज्या जमावाने तोडफोड केली. त्यांचा शोध घेतला जात आहे.

संबंधित बातम्या

सीएसटी परिसरात तोडफोड,जाळपोळ (व्हिडिओ) आसाम पाचव्या दिवशीही धुमसतंय, 44 जणांचा मृत्यू (आजचा सवाल) आसाममधील हिंसाचार रोखण्यात गोगोई सरकारनं चालढकल केली आहे का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 11, 2012 11:02 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close