S M L

शिवसेनेच्या नेत्यांनी घेतली साबीरभाईंची भेट

07 नोव्हेंबरमाजी कामगार मंत्री आणि कट्टर शिवसैनिक साबीर शेख यांच्या विपन्नावस्थेची बातमी आयबीएन लोकमतनं मंगळवारी दाखवल्यानंतर आज शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख एकनाथ शिंदे, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, राजन विचारे, आणि कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी साबीर भाईंच्या घरी जाऊ त्यांची भेट घेतली. साबीरभाई यांच्या तब्येतीची त्यांनी विचारपूस केली आणि साबीर भाईंशी मनमोकळ्या गप्पाही मारल्या. साबीर भाई वन रुम किचनंच्या अत्यंत साध्या घरात विपन्नावस्थेत जगत आहे त्यांना मणक्याचा आजार झालाय. डायबिटीसनं जर्जर ग्रासलंय. पत्नीच्या निधनानंतर साबीर भाई एकटे पडलेत. एकुलती एक मुलगी आहे पण सासरी..भाईंना आधाराशिवाय उठणं अशक्य. बेडजवळ असलेल्या इमर्जन्सी बेल दाबल्यावर मदतीला धावतायत ते शेजारपाजारचे शिवसैनिकच..कामगारमंत्र्यापर्यंतचा प्रवास करुनही स्वतासाठी काहीचं संपत्ती कमावली नाही. त्यांची सर्वसामान्याप्रती असलेला कळवळा त्यांनीच सांगितलेल्या अनुभवावरुन अधोरेखीत होतो. मला खरं म्हणजे मलबार हिलला बंगला मिळणार होता. पण मी सांगितल सर्वसामान्य माणसाला मलबार हिलला जाणं लांब पडणार होतं. मग सरकारनं मला मंत्रालयासमोर बंगला दिला. मग माझ्या बंगल्यावर जनतेचा राबता होता अशी आठवणं साबीर शेख यांनी करून दिली. आजकाल ग्रामपंचायतीचा सदस्य असलेली व्यक्तीसुद्धा आलिशान गाडी घेऊन फिरताना दिसते. पण साबीरभाईंसारखा माणूस एकमेवाद्वीतीयचं.. आयुष्याची संध्याकाळ कठीणं असली तरी साबीरभाईंना आसं आहे ती शिवसैनिकांवरचं..

आईबीएन लोकमत | Updated On: May 17, 2013 02:41 PM IST

शिवसेनेच्या नेत्यांनी घेतली साबीरभाईंची भेट

07 नोव्हेंबर

माजी कामगार मंत्री आणि कट्टर शिवसैनिक साबीर शेख यांच्या विपन्नावस्थेची बातमी आयबीएन लोकमतनं मंगळवारी दाखवल्यानंतर आज शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख एकनाथ शिंदे, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, राजन विचारे, आणि कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी साबीर भाईंच्या घरी जाऊ त्यांची भेट घेतली. साबीरभाई यांच्या तब्येतीची त्यांनी विचारपूस केली आणि साबीर भाईंशी मनमोकळ्या गप्पाही मारल्या.

साबीर भाई वन रुम किचनंच्या अत्यंत साध्या घरात विपन्नावस्थेत जगत आहे त्यांना मणक्याचा आजार झालाय. डायबिटीसनं जर्जर ग्रासलंय. पत्नीच्या निधनानंतर साबीर भाई एकटे पडलेत. एकुलती एक मुलगी आहे पण सासरी..भाईंना आधाराशिवाय उठणं अशक्य. बेडजवळ असलेल्या इमर्जन्सी बेल दाबल्यावर मदतीला धावतायत ते शेजारपाजारचे शिवसैनिकच..कामगारमंत्र्यापर्यंतचा प्रवास करुनही स्वतासाठी काहीचं संपत्ती कमावली नाही. त्यांची सर्वसामान्याप्रती असलेला कळवळा त्यांनीच सांगितलेल्या अनुभवावरुन अधोरेखीत होतो. मला खरं म्हणजे मलबार हिलला बंगला मिळणार होता. पण मी सांगितल सर्वसामान्य माणसाला मलबार हिलला जाणं लांब पडणार होतं. मग सरकारनं मला मंत्रालयासमोर बंगला दिला. मग माझ्या बंगल्यावर जनतेचा राबता होता अशी आठवणं साबीर शेख यांनी करून दिली. आजकाल ग्रामपंचायतीचा सदस्य असलेली व्यक्तीसुद्धा आलिशान गाडी घेऊन फिरताना दिसते. पण साबीरभाईंसारखा माणूस एकमेवाद्वीतीयचं.. आयुष्याची संध्याकाळ कठीणं असली तरी साबीरभाईंना आसं आहे ती शिवसैनिकांवरचं..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 7, 2012 03:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close