S M L

चॉपरचा दाख दाखवून भरदिवसा 70 लाख लुटले

03 एप्रिलमुंबई : इथं दादर पूर्वेला करिश्मा बारजवळ धारदार चॉपरचा धाक दाखवून भरदिवसा 70 लाख रुपये लुटण्याची खळबळजनक घटना घडली आहे. दादर येथील सनशाईन प्लाझा बिल्डरकडे एका इन्व्हेस्टमेंट कंपनीचे कर्मचारी कारमधून 70 लाखांची रोकड घेऊन जात होते. ही कार करिश्मा बारजवळ येताच मागून येणार्‍या एका पांढर्‍या हुंडाई गाडीने ओव्हरटेक करून कारला अडवले आणि लुटारुंनी चॉपरने कारवर हल्ला केला. गाडीच्या काचा फोडून कर्मचार्‍यांना चॉपरचा धाक दाखवून त्यांच्या जवळचे 70 लाख रुपये लुटले. मात्र या हल्ल्यात कारमधील कोणताही कर्मचारी जखमी झाला नाही अशी माहिती पोलीस निरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: May 17, 2013 03:03 PM IST

चॉपरचा दाख दाखवून भरदिवसा 70 लाख लुटले

03 एप्रिल

मुंबई : इथं दादर पूर्वेला करिश्मा बारजवळ धारदार चॉपरचा धाक दाखवून भरदिवसा 70 लाख रुपये लुटण्याची खळबळजनक घटना घडली आहे. दादर येथील सनशाईन प्लाझा बिल्डरकडे एका इन्व्हेस्टमेंट कंपनीचे कर्मचारी कारमधून 70 लाखांची रोकड घेऊन जात होते. ही कार करिश्मा बारजवळ येताच मागून येणार्‍या एका पांढर्‍या हुंडाई गाडीने ओव्हरटेक करून कारला अडवले आणि लुटारुंनी चॉपरने कारवर हल्ला केला. गाडीच्या काचा फोडून कर्मचार्‍यांना चॉपरचा धाक दाखवून त्यांच्या जवळचे 70 लाख रुपये लुटले. मात्र या हल्ल्यात कारमधील कोणताही कर्मचारी जखमी झाला नाही अशी माहिती पोलीस निरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 3, 2013 11:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close