S M L
  • काटजू यांचे सेना-मनसेवर टीकास्त्र

    Published On: Apr 1, 2013 11:07 AM IST | Updated On: May 17, 2013 03:01 PM IST

    01 एप्रिलमुंबई : आपल्या विधानांमुळे सतत चर्चेत राहणारे प्रेस कॉन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मार्कंन्डेय काटजू पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. भूमिपुत्रांचा मुद्दा हा राष्ट्रविरोधी आहे, देशाच्या एकात्मतेला यामुळे धोका असल्याचं ते म्हणाले. देशामध्ये प्रत्येक नागरिकाला कुठेही राहण्याचा,व्यापार करण्याचा अधिकार आहे. उत्तरप्रदेशमधील नागरिकांना महाराष्ट्रात राहण्यासाठी मराठी माणसा इतकाच अधिकार आहे. आणि मराठी माणसालाही इतर राज्यात राहण्याचा अधिकार आहे. पण अगोदर दक्षिण भारतातील लोकांना हकलवून लावले आता बिहारी लोकांना बाहेर काढले जात आहे. हे काही जी लोक करत आहे ते अत्यंत देशविरोधी कृत्य आहे. यामुळे देशाचे तुकडे होईल, देश कसा चाललेल ? अशी टीका काटूज यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं नाव न घेता केली. तसंच पाकिस्तान हा देश सध्या पागलखाना झाला आहे. दररोज बाँबस्फोट होत असल्यानं लोकांना जगणं कठीण झालंय. भारत आणि पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांवर अन्याय होत आहे असा आरोपही त्यांनी केला. काटजूंच्या या वक्तव्यांमुळे त्यांनी शिवसेना आणि मनसेवर टीका केल्याचं मानलं जातंय. भिवंडीत झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close