S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • जितेंद्र आव्हाडांचे संपर्क कार्यालयही अनधिकृत !
  • जितेंद्र आव्हाडांचे संपर्क कार्यालयही अनधिकृत !

    Published On: Apr 9, 2013 11:03 AM IST | Updated On: May 14, 2013 03:45 PM IST

    09 एप्रिलठाण्यात फक्त अनधिकृत घर बांधून विकण्यापर्यंत राजकारणी थांबलेले नाहीत. त्यांनी सर्रासपणे पक्षकार्यालंयसुद्धा अनधिकृतपणे उभारायला सुरवात केली. ज्यांच्या मतदारसंघात सर्वाधिक अनधिकृत बांधकाम आहेत ते राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा कळवा इथलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संपर्क कार्यालयसुद्धा अनधिकृत आहे. आणि सत्तेतल्या आमदाराच्या अनधिकृत बांधकामाला कसं काय तोडायचं हा प्रश्न मूग गिळून बसलेल्या प्रशासनाला पडलेला दिसतोय. ठाणे शहरात अनधिकृत बांधकामात सर्व राजकीय पक्ष आघाडीवर आहेत. अनधिकृत इमारतींचा विळखा या शहराला आहेच. पण राजकीय पक्षांची संपर्क कार्यालयसुद्धा अनधिकृत बांधकामात आघाडीवर आहेत. एक नजर टाकूयात आकडेवारीवर.पक्षकार्यालयंही अनधिकृतविभाग शिवसेना काँग्रेसराष्ट्रवादीभाजप वर्तकनगर 100 0 कोपरी 6120 रायलादेवी 8404नौपाडा 11411वागळे इस्टेट8200मुंब्रा1120कळवा 3000माजीवडा5111मानपाडा10200उथळसर 300 0

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close