S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • अनधिकृत बांधकामं आव्हाडांच्या कृपेने -भोईर
  • अनधिकृत बांधकामं आव्हाडांच्या कृपेने -भोईर

    Published On: Apr 8, 2013 10:48 AM IST | Updated On: May 14, 2013 03:54 PM IST

    08 एप्रिलठाणे महापालिका हद्दीत सर्वाधिक अनधिकृत बांधकाम मुंब्रा परिसरात होत आहे आणि या बांधकामांना राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड अभय देत असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी केला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पुढे करुन त्यांच्या नावे जितेंद्र आव्हाड अनधिकृत निकृष्ट दर्जाचं आणि कुचकामी बांधकाम करत असल्याचा सुभाष भोईरांचा आरोप आहे. महापालिकेनं दिलेल्या अनधिकृत बांधकामाचा अहवाल पाहता मुंब्रा अनधिकृत बांधकाम आघाडीवर असल्याचं स्पष्ट झालंय. तर जितेंद्र आव्हाड यांनी भोईर यांचा आरोप फेटाळून लावलाय. त्यांनी केलेले आरोप खोटे आहे याप्रकरणी एसआयटीच्या चौकशीला सामोरं जाण्यासाठी तयार आहे असंही आव्हाड म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close