S M L
  • उदयन राजेंच्या राज्यभिषेकाचा असाही निषेध

    Published On: Apr 9, 2013 11:29 AM IST | Updated On: May 14, 2013 03:45 PM IST

    09 एप्रिलउदयन राजे भोसले यांचा राज्यभिषेक सोहळ्याला श्रमजीवी संघटनेनं अनोख्या पद्धतीने निषेध केला आहे. मुंबईत राजेंचा प्रतिकात्मक राज्याभिषेक करण्यात येतोय. श्रमजीवी संघटनेच्या वतीने आमदार विवेक पंडित हा प्रतिकात्मक राज्याभिषेक करत आहे. कुळांच्या जमिनी मनमानी पद्धतीने स्वतःच्या नावावर केल्याच्या निषेधार्थ हे अनोख आंदोलन करण्यात येतंय. छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज म्हणवणारे उदयन राजे भोसले यांनी 20 हजार शेतकर्‍यांच्या 35 हजार एकर जमिनीवर आपले नाव लावून घेतले आहे. शिवरायांनी सांगितले होते रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावयचा नाही पण आता ही लोकं संपूर्ण भाजीच खाऊन टाकत आहे अशी टीका आमदार विवेक पंडित यांनी केली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close