S M L
  • भरधाव कारने चौघांना उडवले,1 ठार

    Published On: Apr 16, 2013 11:37 AM IST | Updated On: May 14, 2013 02:34 PM IST

    16 एप्रिलऔरंगाबाद : इथं एका शिकाऊ कार चालकाने वडिलांसह दोन मुलींना आपल्या कारनं उडवलं. या अपघातात एका चिमुरडीचा जागीच मृत्यू झालाय तर दुसरी मुलगी आणि वडील जखमी झाले आहेत. शहरातील टीव्ही सेंटर परिसरातील मुख्य संभाजी चौकात दोन दोन मुलींसह वडील रस्ता ओलांडत होते. त्यावेळी अचानक समोरून आलेल्या कारने या तिघांना जोराची धडक दिली. यानंतरही कार थांबली नाही पुढे काही अंतर जाऊन एक दुचाकीस्वाराला धडक देऊन एका दुकानवर जाऊन कार धडकली. या अपघातात चिमुरडीचा मुत्यू झाला. तर दोघे जण जखमी झाले. अपघातानंतर संतप्त जमावाने गाडीची तोडफोड केली. गाडी चालवत असणारा ड्रायव्हर हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कादिर मौलाना यांची मुलगा असल्याची माहिती मिळाली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close