S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • डोंबिवलीकरांनी केलं जल्लोषात नवं वर्षांचं स्वागत
  • डोंबिवलीकरांनी केलं जल्लोषात नवं वर्षांचं स्वागत

    Published On: Apr 11, 2013 03:34 PM IST | Updated On: May 14, 2013 03:16 PM IST

    11 एप्रिलगुढीपाडवा अर्थात चैत्रपाडवा... म्हणजे मराठी नववर्ष... साडे तीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त... या दिवशी महाराष्ट्रात घरोघरी गुढी उभारून नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं. काठीला तांबडे वस्त्र नेसवून, फुलांची माळ आणि साखरेची गाठी बांधून तयार केलेली ही गुढी घरावर उंच लावून आनंद साजरा करतात. या निमित्तानं ठिकठिकाणी शोभायात्रा काढण्यात आल्या.डोंबिवली म्हणजे मुंबईतला खास मराठमोळा भाग... इथेच पाडव्याच्या शोभायात्रांची सुरुवात झाली. डोंबिवलीतल्या शोभायात्रेत सर्व लोक उत्साहाने सहभागी झाले. या शोभायात्रेत काही तरूण-तरूणी मोटारसायकलीवरुन सहभागी झाले होते. तसंच मैदानी खेळाचं दर्शन घडलं.यात 85 वर्षांचे अप्पा आजही तडफेने हा खेळ खेळतात. तर जागृक डोंबिवलीकरांनी शोभायात्रेत पाण्याचाही प्रश्न मांडला. तर पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर बाजारात खरेदीसाठी महिलांची झुंबड उडाली. मिठाई, फुलबाजारां इतकीच गर्दी सराफांकडे बघायला मिळते.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close