S M L

अनधिकृत बांधकामासाठी लाच उकळणारे 36 पोलीस निलंबित

11 एप्रिलएका स्टिंग ऑपरेशनमध्ये पोलीस आणि बेकायदा बांधकाम करणारे बिल्डर्स यांच्यातील लागेबांधे उघड झाल्यावर सरकारने तब्बल 36 पोलिसांना निलंबित केलंय. कुर्ला भागात बेकायदा बांधकाम करू देण्यासाठी पोलीसच लाच घेताना या स्टिंग ऑपरेशनमध्ये आढळून आले आहेत. गेल्याच आठवड्यात ठाण्यात शिळफाट्याजवळ इमारत कोसळून 74 जणांना आपला प्राण गमवावा लागला होता. दरम्यान, इतक्या सगळ्या पोलिसांवर कारवाई होत असण्याची ही पहिलीच वेळ आहे असं गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी म्हटलंय. या प्रकरणात जर वरिष्ठ पोलीस अधिकारी सहभागी असतील तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल असंही पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2013 03:20 PM IST

अनधिकृत बांधकामासाठी लाच उकळणारे 36 पोलीस निलंबित

11 एप्रिल

एका स्टिंग ऑपरेशनमध्ये पोलीस आणि बेकायदा बांधकाम करणारे बिल्डर्स यांच्यातील लागेबांधे उघड झाल्यावर सरकारने तब्बल 36 पोलिसांना निलंबित केलंय. कुर्ला भागात बेकायदा बांधकाम करू देण्यासाठी पोलीसच लाच घेताना या स्टिंग ऑपरेशनमध्ये आढळून आले आहेत. गेल्याच आठवड्यात ठाण्यात शिळफाट्याजवळ इमारत कोसळून 74 जणांना आपला प्राण गमवावा लागला होता. दरम्यान, इतक्या सगळ्या पोलिसांवर कारवाई होत असण्याची ही पहिलीच वेळ आहे असं गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी म्हटलंय. या प्रकरणात जर वरिष्ठ पोलीस अधिकारी सहभागी असतील तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल असंही पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 11, 2013 10:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close