S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • 'मृत्यूच्या सापळ्यात' राहताय बोटावाला चाळीतले रहिवाशी !
  • 'मृत्यूच्या सापळ्यात' राहताय बोटावाला चाळीतले रहिवाशी !

    Published On: Apr 22, 2013 04:16 PM IST | Updated On: May 14, 2013 02:17 PM IST

    विनोद तळेकर, मुंबईमुंबई (22 एप्रिल 2013): ठाण्यातल्या शीळ फाट्याच्या दुर्घटनेनंतर अनधिकृत बांधकामांवर कारवाईला सुरूवात झालीय. त्यामुळे अनेक निर्दोष जीवांचे प्राण वाचतील. पण मुंबईतल्या धोकादायक इमारतींमध्ये राहाणार्‍या लोकांच्या जीवावरचा धोका अजून टळला नाही. माझगावच्या बोटावाला चाळीतले रहिवाशी विकासकाच्या मनमानी कारभारामुळे असेच धोकादायक परिस्थितीत वावरतायत..दुपारच्या निवांत क्षणी एखाद्या चाळीतला मुलांचा हा किलबिलाट...या मुलांच्या जीवाला धोका आहे, असं जर तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला ते खोटं वाटेल..ही मुलं अतिशय धोकादायक अशा इमारतीत खेळताहेत..म्हाडाने चार वर्षापुर्वीच माझगावची ही बोटावाला चाळ धोकादायक म्हणून जाहीर केली.ही चाळ सराह हाऊसिंग डेव्हलपमेंट प्रा. ली. या विकासकाने पुनर्विकासासाठी घेतलीय. म्हाडाने 14 जानेवारी 2013 ला विकासकाला पुनर्विकासाची परवानगी दिली. म्हाडाच्या पुनर्विकास नियमावलीतल्या नियम 39 प्रमाणे परवानगी मिळाल्याच्या तीन महिन्यात सर्व भाडेकरूंची पर्यायी व्यवस्था करून पुनर्विकासाला सुरूवात होणं गरजेचं आहे. रहिवाशांचा खरंतर या पुनर्विकासाला विरोध नाही, पण तरीही प्रकल्प रखडलाय.आता परवानगी मिळून तीन महिने उलटून गेलेत. त्यामुळे करार रद्द होण्याच्या भीतीनं विकासकानं चाळीत जवळपास 60 टक्के रहिवाशी राहात असतानाही पाईलिंगच्या कामाला सुरूवात केलीय. त्याच्या हादर्‍यामुळे ही चाळ केव्हाही कोसळू शकते अशी भीती रहिवाशांना वाटतेय. तरीही म्हाडा दखल घेत नाहीए,त्यामुळे रहिवाशी आता कदाचित देवाच्याच भरवशावर या मृत्यूच्या सापळ्यात राहत आहेत.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close