S M L

अखेर निघाली डहाणू - चर्चगेट लोकल !

16 एप्रिल 13मुंबई : गेल्या कित्येक वर्षांपासून डहाणू ते चर्चगेट लोकल रेल्वे सेवेची मागणी अखेर आज पूर्ण झाली. रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी या पहिल्या लोकल सेवेला हिरवा झेंडा दाखवला आणि 10 वाजून 50 मिनिटांनी ही लोकल धावली. विरारच्या पुढे ही लोकल सेवा सुरू झाल्यामुळे या भागातल्या नागरिकांचा ठाणे, मुंबईशी संपर्क जलद होणार आहे. या मागणीकडे गेले कित्येक वर्ष रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करत होते. पण आता ही सेवा सुरु झाल्याबद्दल डहाणूकरांनी एकच जल्लोष केलाय. स्टेशनच्या आवारात प्रवाशांनी ढोल-ताशा,पारंपारिक नृत्य करून नव्या रेल्वेचं स्वागत केलं आहे. तसंच लोकलच्या फेर्‍याही वाढवण्यात याव्यात अशी मागणीही नागरिकांकडून होतेय.

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2013 02:35 PM IST

अखेर निघाली डहाणू - चर्चगेट लोकल !

16 एप्रिल 13

मुंबई : गेल्या कित्येक वर्षांपासून डहाणू ते चर्चगेट लोकल रेल्वे सेवेची मागणी अखेर आज पूर्ण झाली. रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी या पहिल्या लोकल सेवेला हिरवा झेंडा दाखवला आणि 10 वाजून 50 मिनिटांनी ही लोकल धावली. विरारच्या पुढे ही लोकल सेवा सुरू झाल्यामुळे या भागातल्या नागरिकांचा ठाणे, मुंबईशी संपर्क जलद होणार आहे. या मागणीकडे गेले कित्येक वर्ष रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करत होते. पण आता ही सेवा सुरु झाल्याबद्दल डहाणूकरांनी एकच जल्लोष केलाय. स्टेशनच्या आवारात प्रवाशांनी ढोल-ताशा,पारंपारिक नृत्य करून नव्या रेल्वेचं स्वागत केलं आहे. तसंच लोकलच्या फेर्‍याही वाढवण्यात याव्यात अशी मागणीही नागरिकांकडून होतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 16, 2013 11:16 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close