S M L

मुंबईतील संपकरी प्राध्यापकांचे पगार थांबवले

26 एप्रिलमुंबई : गेल्या 82 दिवसांपासून संपावर असलेल्या प्राध्यापकांवर कारवाईला सुरूवात झाली आहे. मुंबई विभागातील 47 कॉलेजच्या प्राध्यापकांचे पगार थांबवण्यात आले आहे. ही कारवाई राज्यभर केली जाणार आहे. त्याची सुरूवात मुंबईपासून सुरू झाली आहे अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी IBN लोकमतला दिली. तसंच प्राध्यापकांच्या सहाव्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता आज सरकारनं दिला आहे. यासाठीचे 500 कोटी रुपये सरकारनं वितरीत केले आहेत अशी घोषणा राजेश टोपे यांनी IBN लोकमतवर केली. प्राध्यापकांनी थोडासा संयम दाखवून सरकारवर विश्वास दाखवावा आणि संप मागे घ्यावा, असं आवाहनही टोपे यांनी केलंय. मात्र प्राध्यापकांनी त्वरित कामाला लागावं अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.संपकरी प्राध्यापकांना आयबीएन-लोकमतचे सवाल ?- मार्डचा संप मिटला, प्राध्यापकांचा संप कधी मिटणार?- प्राध्यापक करतील का डॉक्टर्सचं अनुकरण- प्राध्यापक कधी करणार विद्यार्थ्यांचा विचार - गेल्या 82 दिवसांपासूनची आडमुठी भूमिका सोडणार का?- सरकारनं 500 कोटींचा पहिला हप्ता दिला आतातरी कामावर परतणार का?

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2013 02:05 PM IST

मुंबईतील संपकरी प्राध्यापकांचे पगार थांबवले

26 एप्रिल

मुंबई : गेल्या 82 दिवसांपासून संपावर असलेल्या प्राध्यापकांवर कारवाईला सुरूवात झाली आहे. मुंबई विभागातील 47 कॉलेजच्या प्राध्यापकांचे पगार थांबवण्यात आले आहे. ही कारवाई राज्यभर केली जाणार आहे. त्याची सुरूवात मुंबईपासून सुरू झाली आहे अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी IBN लोकमतला दिली. तसंच प्राध्यापकांच्या सहाव्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता आज सरकारनं दिला आहे. यासाठीचे 500 कोटी रुपये सरकारनं वितरीत केले आहेत अशी घोषणा राजेश टोपे यांनी IBN लोकमतवर केली. प्राध्यापकांनी थोडासा संयम दाखवून सरकारवर विश्वास दाखवावा आणि संप मागे घ्यावा, असं आवाहनही टोपे यांनी केलंय. मात्र प्राध्यापकांनी त्वरित कामाला लागावं अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

संपकरी प्राध्यापकांना आयबीएन-लोकमतचे सवाल ?

- मार्डचा संप मिटला, प्राध्यापकांचा संप कधी मिटणार?- प्राध्यापक करतील का डॉक्टर्सचं अनुकरण- प्राध्यापक कधी करणार विद्यार्थ्यांचा विचार - गेल्या 82 दिवसांपासूनची आडमुठी भूमिका सोडणार का?- सरकारनं 500 कोटींचा पहिला हप्ता दिला आतातरी कामावर परतणार का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 26, 2013 10:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close