S M L
  • रामदास यांना पुन्हा 'आठवले' राज ठाकरे !

    Published On: May 27, 2013 01:22 PM IST | Updated On: May 29, 2013 04:10 PM IST

    मुंबई 27 मे : आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आठवले आहे. आघाडी सरकारला पाडण्यासाठी महायुतीला बळकट करण्याची आज गरज आहे यासाठी राज ठाकरेंनी महायुतीत यावं असं आवाहन रामदास आठवले दिलं. मुंबईत झालेल्या एक सभेत ते बोलत होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर लिलावती हॉस्पिटलमध्ये अँजिओप्लास्टी झाली होती. त्यावेळी खुद्द राज ठाकरे दोन दिवस उद्धव यांच्यासोबत होते. आजारपणाच्या निमित्ताने राज आणि उद्धव एकत्र आल्यामुळे राजकीय वर्तुळात राज-उद्धव एकत्र येतील या चर्चेला उधाण आलं होतं. त्यावेळी रामदास आठवलेंनी राज ठाकरेंनी महायुतीत येऊ नये असा जाहीर विरोध केला होता. राज महायुतीत आले तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल असा इशारा दिला होता. पण राज-उद्धव काही एकत्र आले नाही. मध्यंतरी औरंगाबादमध्ये रामदास आठवलेंना पुन्हा एकदा राज 'आठवले'. त्यांनी थेट राज यांनी महायुतीत यावं अशी ऑफर दिली होती. अगोदर विरोध आणि त्यानंतर थेट 'निमंत्रण' दिल्यामुळे आरपीआयचे कार्यकर्ते बुचकळ्यात पडले. आता पुन्हा एकदा त्यांना राज ठाकरेंची आठवण आली. मात्र राज यांनी अगोदर 'एकला चलो रे'चा नारा दिला आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close