S M L
  • मुंबईत सेनेमुळेच मराठी टक्का घटला -राणे

    Published On: May 31, 2013 11:41 AM IST | Updated On: May 31, 2013 11:41 AM IST

    मुंबई 31 मे : मुंबईतील मराठी टक्का कमी होण्यासाठी शिवसेनाच जबाबदार असल्याची टीका उद्योगमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर केली. त्याचप्रमाणे मुंबईतल्या अनधिकृत बांधकामं वाढण्यामागेही शिवसेनाच जबाबदार असल्याचा आरोप राणे यांनी केला. राणे यांनी शिवसेना नेते मनोहर जोशींनाही टार्गेट केलंय. मराठी माणसं मुंबईतून कमी होत असताना जोशींसारख्या सेनानेत्यांनी मोठ्या प्रमाणावर जमिनी विकत घेतल्या असा आरोपही राणे यांनी केला.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close