S M L

'शिवसेनेचा यू-टर्न, मोदींवर टीका केली नाही'

Sachin Salve | Updated On: Jun 25, 2013 06:27 PM IST

'शिवसेनेचा यू-टर्न, मोदींवर टीका केली नाही'

udhav thakare on modi24 जून : नरेंद्र मोदींवर आजच्या अग्रलेखातून आम्ही कोणतीही टीका केलेली नाही, मोदींनी राष्ट्रीय पातळीवर दमदार पदार्पण केलंय. आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे, पण ज्या बातम्या आल्या होत्या त्यावर आम्ही थोडी नाराजी व्यक्त केली, पण नरेंद्र मोदींवर टीका केली नाही. मोदींनी जे काही केलं आहे ते योग्य आहे ते इतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही करावं अशी सारवासारव शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. तसंच राष्ट्रीय आपत्तीवर कोणीही राजकारण करू नये अशी सेनेची भूमिका आहे त्यामुळे आम्ही भाजपवर टीका केली नाही आणि काँग्रेसवरही टीका केली नाही असा खुलासाच उद्धव यांनी केला. आज शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखातून मोदींवर टीका करण्यात आली आणि दुपार होताच खुद्द पक्षप्रमुखांनी यावर यू-टर्न घेतला.

"देश मोठा आहे. मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असले तरी त्यांची नियुक्ती आता राष्ट्रीय कार्यासाठी झाली आहे. मोदी यांनी उत्तराखंडात जाऊन गुजराती भाविकांना वाचविले असे सांगणे बरोबर नाही. या कामाबद्दल गुजरात सरकार व मुख्यमंत्र्यांचे स्वागत करावे तेवढे थोडेच. पण देशाचे संभाव्य उमेदवार म्हणून निवड होत असताना मोदी यांनी फक्त गुजरात एके गुजरात करावे व आपण फक्त गुजरात राज्यातील जनतेच्या सुख-दु:खाचा विचार करतो अशी भूमिका घ्यावी हे मारक आहे. आपत्तीच्या प्रसंगी संकुचित किंवा प्रादेशिक नव्हे तर राष्ट्रीय विचार करणे आवश्यक आहे" अशा शब्दात शिवसेनेनं मोदींच्या पराक्रमाचा समाचार 'सामना'च्या अग्रलेखातून घेतला.

पण सकाळी टीका केल्यानंतर खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सारवासारव केली. आम्ही नरेंद्र मोदींवर टीका केली नाही, ज्या बातम्या आल्या त्यावर आम्ही नाराजी व्यक्त केली. पण नरेंद्र मोदींनी आज राष्ट्रीय पातळीवर दमदार पर्दापण केलं आहे. त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे. त्यांनी उत्तराखंडमध्ये जाऊन गुजराथी लोकांना वाचवलं. गुजराथी लोक हे हिंदूच आहे. मोदींनी केलेली मदत योग्यही आहे. जर इतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलं असतं तर ते अधिक योग्य असतं. आजही उत्तराखंडमध्ये भयावह परिस्थिती आहे पण मोदींनी भेट दिल्यानंतर काँग्रेसने केलेली टीका हीन दर्जाची आहे. राष्ट्रीय आपत्तीवर कोणीही राजकरण करू नये अशीच शिवसेनेची भूमिका आहे त्यामुळे आम्ही ना नरेंद्र मोदींवर टीका केली ना काँग्रेसवर असा खुलासा उद्धव ठाकरेंनी केला.

'मनसे'चा विषय संपला' 

राजनाथ सिंग अलीकडे आम्हाला भेटून गेले. त्यांनी आम्हाला स्पष्ट शब्दात सांगितलं, भाजप आणि शिवसेनेची युती ही नैसर्गिक आहे, त्यामुळे दुसर्‍या, तिसर्‍या कोणालाही घ्यायचा विचार दिल्लीच्या नेतृत्वात नाही त्यामुळे एवढ्याच विषयावर देशाच,राज्याच राजकारण या गोष्टीवर अवलंबून नाही. आम्ही मजबूत आहोत असं सांगत उद्धव यांनी मनसे-सेना महायुतीच्या विषयावर पडदा टाकला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 25, 2013 04:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close