S M L

'फ्री वेला कुणाचंही नाव देऊ नका'

Sachin Salve | Updated On: Jul 1, 2013 08:04 PM IST

'फ्री वेला कुणाचंही नाव देऊ नका'

01 जुलै : ईस्टर्न फ्री वेच्या नामकरणावरून चांगलाचा वाद रंगलाय. शिवसेनेवर कुरघोडी करण्यासाठी मनसेनं या नव्या फ्री वेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची मागणी केली. पण, इस्टर्न फ्री वेला बाळासाहेबांचं नाही तर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं, अशी मागणी करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं मनसेला शह देण्याचा प्रयत्न केला.

 

हा वाद सुरू असतानाच भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी मात्र या फ्री-वेला कुणाचंही नाव देऊ नये अशी भूमिका मांडली आहे. मुंबईत याआधीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव एका मुख्य रस्त्याला आहे. असं असताना पुन्हा एका रस्त्याला बाबासाहेबांचं नाव देण्याची मागणी करणं म्हणजे निव्वळ राजकारण आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या

 

» ईस्टर्न फ्री-वेच्या नावावरून मनसे-रिपाइंत जुंपली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 1, 2013 07:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close