S M L

मंत्रालयातील अधिकार्‍यांचा सामूहिक रजेचा इशारा

Sachin Salve | Updated On: Jul 2, 2013 08:04 PM IST

मंत्रालयातील अधिकार्‍यांचा सामूहिक रजेचा इशारा

 मुंबई 02 जुलै : मंत्रालयाचा मेकओव्हरचं काम जोरात सुरू आहे. या नव्या मंत्रालयात मंत्र्यांना नव्या केबीन देण्यात आल्या आहेत. पण साहेबांना केबिन मग आम्हाला का नाही ? असा सवाल करत जवळपास एक हजार सचिव, अधिकारी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

 

16 जुलैपासून हे सचिव आणि अधिकारी सामूहिक रजेवर जाण्याचा इशारा दिलाय. मंत्रालयाच्या नूतनीकरणामध्ये सचिवांना केबिनच मिळालेल्या नाहीत. त्यामुळे हे सचिव नाराज आहेत. उपसचिव, सहसचिव, अवर सचिव आणि कक्ष अधिकारी यांचा यामध्ये समावेश आहे. राजपत्रित अधिकारी महासंघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. या सचिवांनी आंदोलन केलं तर राज्याच्या पावसाळी अधिवेशनावर परिणाम होऊ शकतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 2, 2013 08:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close