S M L

गणेश नाईकांच्या ग्लास हाऊसवर अजूनही हातोडा नाही

Sachin Salve | Updated On: Jul 19, 2013 10:44 PM IST

ganesh naik19 जुलै : उत्पादन शुल्क मंत्री गणेश नाईक यांचं बेलापुरात असलेलं ग्लास हाऊस दोन आठवड्यात तोडा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने 5 जुलै रोजी दिले होते. मात्र दुसर्‍या आठवड्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. पण अजूनही पालिकेनं या ग्लास हाऊसवर कारवाई केलेली नाही. सध्या हे ग्लास हाऊस पडदा टाकून झाकण्यात आलंय. विशेष म्हणजे हे ग्लास हाऊस आम्ही स्वत: पाडू असा शब्द नाईक यांच्या कुटुंबियांनी उच्च न्यायालयाला दिला होता. मात्र त्यांनीही दिलेला शब्द आत्तापर्यंत तरी पाळलेला दिसत नाही. चार महिन्यांपूर्वी संदीप ठाकूर या आरटीआय कार्यकर्त्याने ग्लास हाऊस अनधिकृत आहे, त्यावर कारवाई व्हायला हवी अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर न्यायालयानं हाऊस तोडण्याचे आदेश दिले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 19, 2013 10:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close