S M L

आदिवासींच्या धान्यावर धान्यमाफियांचा डल्ला

Sachin Salve | Updated On: Jul 30, 2013 10:00 PM IST

आदिवासींच्या धान्यावर धान्यमाफियांचा डल्ला

30 जुलै : कुपोषणानं गेल्या आठवड्याभरात सात बालकांचा जव्हारमध्ये मृत्यू झालाय. ठाणे जिल्ह्यात अनेक कुपोषित आदिवासी बालकं मृत्युशी झुंज देत आहेत. अशा परिस्थितीत या आदिवासींना मिळणारा रेशनिंगचा तांदळाचा काळाबाजार होतोय. याचं व्हिडिओ फूटेज आयबीएन लोकमतच्या हाती लागलंय.

आदिवासींसाठी असलेलं धान्य सरकारी ट्रेड मार्कच्या गोण्यांमधून काढलं जातं आणि व्यापारी कंपन्यांच्या शिक्के असलेल्या गोण्यांमध्ये भरून गुजरातमध्ये विकण्यात येतं. तलासरीमध्ये एका चित्रपट थिएटर मागे शासकीय स्वस्त धान्य भरलेले ट्रक उभे केले जातात. त्यातलं धान्य इतर गोण्यामध्ये भरण्याचा हा गोरखधंदा राजेरोसपणे सुरू आहे.

या ठिकाणी आयबीएन लोकमतचे प्रतिनिधी पोहचताच काळाबाजार करणार्‍यांनी पळ काढला. गेल्या अनेक दिवसांपासून हा गोरखधंदा रोजेरोसपणे सुरू असूनही याकडे स्थानिक प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष होतंय. या धान्यमाफियांशी सरकारी कर्मचारांशी संगनमतानं हे प्रकार होत असल्याचा आरोप होताय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 30, 2013 10:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close