S M L

ज्येष्ठ छायाचित्रकार गजानन घुर्ये यांची आत्महत्या

Sachin Salve | Updated On: Aug 24, 2013 10:10 PM IST

ज्येष्ठ छायाचित्रकार गजानन घुर्ये यांची आत्महत्या

gajanan gurge24 ऑगस्ट : ज्येष्ठ छायाचित्रकार गजानन घुर्ये यांनी दादरच्या आपल्या राहत्या घरी आज पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली. ते 58 वर्षांचे होते.

दादरमध्ये शिवसेना भवनजवळच्या साईचरण या बिल्डिंगच्या तिसर्‍या मजल्यावर ते आपल्या कुटुंबीयांसोबत रहात होते. आज पहाटे त्यांनी बेडरूममध्ये ओढणी पंख्याला बांधून गळफास घेतला.

सकाळी साडेपाचच्या सुमाराला हा प्रकार घडला. याबाबत पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केलीय. नैराश्यापोटी त्यांनी हे पाऊल उचललं असावं असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 24, 2013 10:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close