S M L

..आणि मनसे सैनिक उपोषणाला बसले

Sachin Salve | Updated On: Aug 31, 2013 09:10 PM IST

..आणि मनसे सैनिक उपोषणाला बसले

mns mumbai31 ऑगस्ट : मराठीचा मुद्दा असो अथवा फेरीवाल्यांचा नेहमी 'खळ्ळ फटॅक' स्टाईलने आंदोलन करणार्‍या मनसे सैनिकांचं अहिंसेच्या मार्गानं आंदोलन केलंय.

 

मुंबईतील गोरेगावमध्ये मनसेनं पुन्हा एकदा फेरिवाल्यांच्या विरोधात हत्यार उपसलं आहे. पण यावेळी मनसेनं आपली मारझोड स्टाईल बदलत चक्क उपोषण करून गांधीगिरीच्या मार्गाचा अवलंब केलाय. गोरेगाव पश्चिमेच्या एम जी रोडवरच्या फेरीवाल्यांच्या विरोधात मनसेनं हे उपोषण सुरू केलंय.

 

एम जी रोडवरच्या फेरीवाल्यांमुळे लोकांना त्रास होत असल्याची लेखी तक्रारही मनसेने महापालिकेकडे केली होती. पण महापालिकेने काहीच कारवाई न केल्याने हे उपोषण सुरू केल्याचं मनसेतर्फे सांगण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 31, 2013 09:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close