S M L

नाराज गुरुदास कामत यांनी दिला सर्वपदांचा राजीनामा

ग्रेसचे नेते गुरुदास कामत आपल्यावर सोपवलेल्या सर्व जबाबदाऱ्यातून मुक्त झाले आहे

Sachin Salve | Updated On: Apr 26, 2017 05:06 PM IST

नाराज गुरुदास कामत यांनी दिला सर्वपदांचा राजीनामा

26 एप्रिल : काँग्रेसचे नेते गुरुदास कामत आपल्यावर सोपवलेल्या सर्व जबाबदाऱ्यातून मुक्त झाले आहे. कामत यांनी सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीत नाराज असलेले गुरुदास कामत यांनी उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे आपल्याकडील पदभार काढून घेण्याची विनंती केली होती. गुरुदास कामत यांच्याकडे गुजरात, राजस्थान, दादरा आणि नगर हवेली, दमन दिवची जबाबदारी आहे.  राज्यांची जबाबदारी आहे. तसंच कामत हे काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्यही आहेत.  आता त्यांनी या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.

गुजरातमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फेरबदल करण्यात आले. प्रभारी पदावरुन गुरुदास कामत यांना हटवण्यात आलं. त्यांच्या जागी अशोक गहलोत यांची नियुक्ती करण्यात आली.  गहलोत यांची नियुक्ती करण्यात आल्यामुळे गुरूदास कामत यांनी राजीनामा दिल्याचं बोललं जातंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 26, 2017 05:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close