S M L

डोंबिवलीतील गोळीबारप्रकरणात महिमादास विल्सनचा मृतदेह सापडला

मागच्या मंगळवारी दिलीप भोईर आणि त्यांच्या साथीदारांनी घर दुरुस्तीचा ठेका घेण्याच्या वादातून चौधरी यांच्यावर गोळीबार होता. यात चौधरी यांचा मृत्यू झाला होता. तर यावेळी हल्लेखोरांनी महिमादासचं अपहरण केलं होतं.

Sonali Deshpande | Updated On: May 14, 2017 02:17 PM IST

डोंबिवलीतील गोळीबारप्रकरणात महिमादास विल्सनचा मृतदेह सापडला

14 मे : डोंबिवलीच्या चोळे गावात झालेल्या किशोर चौधरी हत्याप्रकरणात आणखी एका तरुणाचा निर्घृणपणे खून करण्यात आल्याचं उघड झालंय. महिमादास विल्सन असं या तरुणाचं नाव असून तो चौधरी यांच्याकडे काम करत होता.

मागच्या मंगळवारी दिलीप भोईर आणि त्यांच्या  साथीदारांनी घर दुरुस्तीचा ठेका घेण्याच्या वादातून चौधरी यांच्यावर गोळीबार होता. यात चौधरी यांचा मृत्यू झाला होता. तर यावेळी हल्लेखोरांनी महिमादासचं अपहरण केलं होतं. तेव्हापासून तो बेपत्ता होता, अखेर त्याची हत्या करून पोलादपुर-महाबळेश्वर घाटातील दरीत त्याचा मृतदेह टाकल्याची कबुली आरोपींनी दिल्यानंतर मागील २ दिवसांपासून पोलीस मृतदेहाचा शोध घेत होते.

शनिवारी रात्री अखेर मृतदेह सापडल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. त्यामुळे चोळे गाव परिसरात तणावाचं वातावरण आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 14, 2017 02:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close