S M L

जीएसटी प्रक्रियेसाठी आज रेस्टाॅरंटस् रात्री 12च्या आत बंद

मुंबईतील सुमारे ७ हजार उपाहारगृहं शुक्रवारी रात्री बाराच्या आधी बंद होणार आहेत.

Sonali Deshpande | Updated On: Jun 30, 2017 11:35 AM IST

जीएसटी प्रक्रियेसाठी आज रेस्टाॅरंटस् रात्री 12च्या आत बंद

30 जून : जीएसटी प्रक्रियेसाठी आज रात्री साडेअकरानंतर मुंबईतील बहुतांश उपाहारगृहं आणि रेस्तराँ बंद करण्यात येणार आहेत. शनिवार, रविवारच्या सुटीमुळे शुक्रवारी मुंबईतील उपाहारगृहांत मध्यरात्रीनंतरही गजबज असते. मात्र आज मध्यरात्र त्याला अपवाद ठरणार आहे.

जीएसटी नियमांनुसार वातानूकूलित नसलेल्या उपाहारगृहांतील जेवणावर १२ टक्के, वातानुकूलित उपाहारगृहांत १८ टक्के ,पंचतारांकित हॉटेलांनाही १८ टक्के कर लागू करण्यात आला आहे.

जीएसटी लागू करण्यासाठी उपाहारगृहांना आपल्या बिलिंग यंत्रणांमध्येही बदल करावा लागणार आहे. त्यामुळे मुंबईतील सुमारे ७ हजार उपाहारगृहं शुक्रवारी रात्री बाराच्या आधी बंद होणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 30, 2017 11:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close