S M L

विकृतपणाचा कळस, चर्चगेट स्टेशनवर तरुणीचा विनयभंग

चर्चगेट स्थानकावर एक तरुणी लोकलची वाट पाहत उभी असताना तिच्या मागून येऊन एका विकृत तरुणाने...

Sachin Salve | Updated On: Jul 15, 2017 02:48 PM IST

विकृतपणाचा कळस, चर्चगेट स्टेशनवर तरुणीचा विनयभंग

15 जुलै : मुंबईत दिवसेंदिवस लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिल्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येतो आहे. काही दिवसांपूर्वी एक मुलाने सीसीटीव्ही स्थानकवर मुलीला पाहून हस्तमैथून केलं होतं. आता अजून एक नवा प्रताप समोर आला आहे.

चर्चगेट स्थानकावर एक तरुणी लोकलची वाट पाहत उभी असताना तिच्या मागून येऊन एका विकृत तरुणाने तरुणीच्या गुप्तांगाला हात लावण्याचा प्रयत्न केला. यावेळी या तरुणीने आरडा-ओरड करत या तरुणाचा पाठलाग केला.

नेमक याचवेळी चर्चगेट स्थानकावर उभे असलेल्या पोलिसांनी या तरुणाला पकडलं. या तरुणाच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला असून याचे सीसीटीव्ही समोर आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 15, 2017 02:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close