S M L

मुंबईतल्या दादर चौपाटीवर 3 शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू

उनाल मिल हायस्कुल मधली ही तीन मुलं असून 13 ते 16 वर्षांची होती.

Sachin Salve | Updated On: Aug 5, 2017 06:25 PM IST

मुंबईतल्या दादर चौपाटीवर 3 शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू

मुंबई, 05 आॅगस्ट : मुंबईतील दादर चौपाटीवर आज सकाळी पावणे बाराच्या सुमरास 3 मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडलीये.

उनाल मिल हायस्कुल मधली ही तीन मुलं असून 13 ते 16 वर्षांची होती. भारत हनुमंता, अनुप यादव, रोहीत यादव अशी या मुलांची नावं आहे.

शिवाजी पार्कासमोरील समुद्र हा पोहण्यालायक नाही तरीही अनेकजण इथं पाण्यात उतरतात. इथे लाईफगार्डही नसल्यानं अनेकदा जिवालाच मुकावं लागतं. मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी या मुलांना पाण्यातून बाहेर काढलं खरं पण जिवानिशी मात्र वाचवू शकले नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 5, 2017 06:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close