S M L

नवी मुंबईतील सफाई कामगारांचा संप मागे

या संपाचा रूग्णसेवेवर चांगलाच परिणाम झालाय. या संपामुळे 5 मृतदेह पोस्टमार्टेम विना पडून होते. ते मात्र तब्बल 24 तासांनंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले

Chittatosh Khandekar | Updated On: Sep 12, 2017 09:35 AM IST

नवी मुंबईतील सफाई कामगारांचा संप मागे

नवी मुंबई,12 सप्टेंबर: नवी मुंबई महापालिका रुग्णालयातील सफाई कामगारांनी पुकारलेला संप काल मागे घेण्यात आला आहे. या कामगारांच्या मागण्या दोन दिवसात पूर्ण करू या आश्वासनांवर संप मागे घेण्यात आला.

या संपाचा रूग्णसेवेवर चांगलाच परिणाम झालाय. या संपामुळे 5 मृतदेह पोस्टमार्टेम विना पडून होते. ते मात्र तब्बल 24 तासांनंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. काल रात्री डहाणू, पुणे येथे हे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांनी नेले.

ज्या आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभारामुळे मृतदेहाचे हेळसांड झाले त्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यावर कोणतीच कारवाई महापालिका आयुक्तांनी केली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 12, 2017 09:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close