S M L

नवी मुंबईत पुन्हा पोलिसांची मुजोरी, बँन्जो वाजवणाऱ्यांना मारहाण

लग्नाची वरात संपल्यानंतर बँन्जो वाजवणारे आपल्या घरी निघत असताना नेरूळ पोलिसांनी 20 जणांपैकी पाच जणांना ताब्यात घेतले

Sachin Salve | Updated On: Apr 20, 2017 06:11 PM IST

नवी मुंबईत पुन्हा पोलिसांची मुजोरी, बँन्जो वाजवणाऱ्यांना  मारहाण

20 एप्रिल : नवी मुंबईतील कोपरखैरणे भागात हळदीला उशिरापर्यंत डीजे वाजवल्यामुळे नवरदेवाला मारहाणीची घटना ताजी असताना नवी मुंबईतीलच करावे गावात नेरूळ पोलिसांनी बँन्जो पार्टीला मारहाण केल्याची घटना घडलीये.

लग्नाची वरात संपल्यानंतर बँन्जो वाजवणारे आपल्या घरी निघत असताना नेरूळ पोलिसांनी 20 जणांपैकी पाच जणांना ताब्यात घेतले. यावेळी ग्रामस्थ महिलांनी पोलिसांना सोडण्यासाठी विनंती ही केली.

माञ पोलिसांनी पाच जणांना पोलीस स्टेशनला नेवून मारहाण केली.  सुमित तांडेल या तरूणाला जबर मारहाण केल्याने त्याच्यावर महापालिका रूग्णालयात उपचार सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 20, 2017 06:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close