S M L

पवारांना राष्ट्रपती व्हायचं असेल तर एनडीएमध्ये यावं -रामदास आठवले

शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांचे चांगले संबंध आहे. त्यांना जर राष्ट्रपती व्हायचं असेल तर त्यांनी नरेंद्र मोदी यांच्याशी बोललं पाहिजे.

Sachin Salve | Updated On: May 29, 2017 11:38 PM IST

पवारांना राष्ट्रपती व्हायचं असेल तर एनडीएमध्ये यावं -रामदास आठवले

29 मे : शरद पवारांना राष्ट्रपती व्हायचं असेल तर त्यांनी एनडीएमध्ये यावं. त्यांचे आणि नरेंद्र मोदी यांचे चांगले संबंध आहे. मराठी माणूस जर राष्ट्रपती होईल तर आनंदच आहे असं वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं. ते डोंबिवलीत बोलत होते.

राष्ट्रपतिपदाच्या शर्यतीत मोर्चेबांधणी सुरू आहे. शरद पवार यांचं नावही चर्चेत आहे. याबद्दल रामदास आठवले यांना विचारलं असता त्यांनी थेट पवारांना एनडीएमध्ये येण्याचा सल्लाच दिला.

शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांचे चांगले संबंध आहे. त्यांना जर राष्ट्रपती व्हायचं असेल तर त्यांनी नरेंद्र मोदी यांच्याशी बोललं पाहिजे. त्यांना राष्ट्रवादी पक्ष एनडीएमध्ये आणावा लागेल. त्यानंतर पवारांच्या राष्ट्रपतीपदाबाबत विचार होऊ शकतो असं वक्तव्य केलं. तसंच  पवार हे मोठे अनुभवी राजकारणी आहे. ते विरोध पक्षाचे उमेदवार होणार नाही असा अंदाजही पवारांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 29, 2017 11:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close