S M L

लग्न करण्यासाठी अबू सालेमला हवी पॅरोलवर सुटका

स्वत:च्या लग्नासाठी पॅरोल किंवा तात्पुरता जामीन मिळावा, यासाठी मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील मुख्य दोषींपैकी एक असणाऱ्या अबू सालेम याने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

Sonali Deshpande | Updated On: Jul 18, 2017 11:52 AM IST

लग्न करण्यासाठी अबू सालेमला हवी पॅरोलवर सुटका

18 जुलै : स्वत:च्या लग्नासाठी पॅरोल किंवा तात्पुरता जामीन मिळावा, यासाठी मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील मुख्य दोषींपैकी एक असणाऱ्या अबू सालेम याने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

अबू सालेमने आपल्या याचिकेत उच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या दोन निकालांचा दाखला दिला आहे. हे निकाल सुनावताना न्यायालयाने तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या दोषींना लग्न करण्यासाठी तात्पुरत्या कालावधीची सुट्टी दिली होती. त्याचाच आधार घेत आता अबू सालेमने आपली याचिका न्यायालयापुढे मांडली आहे.

अबू सालेमच्या या होणाऱ्या बायकोचं नाव आहे कौसर. ती 27 वर्षांची आहे. अबू सालेमचं हे तिसरं लग्न आहे. पहिलं लग्न समीराशी होऊन तलाकही झाला. त्यानं दुसरं लग्न मोनिका बेदीशी केलं असल्याची चर्चा होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 18, 2017 11:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close