S M L

उघड्यावर लघुशंका करणाऱ्या मंत्र्याचे फोटो व्हायरल

केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह हे उघड्यावर लघुशंका करतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत.

Sonali Deshpande | Updated On: Jun 29, 2017 12:48 PM IST

उघड्यावर लघुशंका करणाऱ्या मंत्र्याचे फोटो व्हायरल

29 जून : पंतप्रधान मोदींच्या स्वच्छ भारत अभियानची चर्चा आणि जाहिरात खूपच जोरात सुरू असते. नागरिकांनी देश स्वच्छ ठेवावा ही संकल्पनाच खूप चांगली आहे. पण याला भाजप मंत्र्यांनीच हरताळ फासलाय.

केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह हे उघड्यावर लघुशंका करतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत.देशावासियांना स्वच्छता राखण्याबाबत प्रोत्साहन देत 'दरवाजा बंद करा' अशी जाहीरात करणाऱ्या भाजपवर आता चौफेर जोरदार टीका होतेय. हा फोटो लांबून घेतलाय. पण तरीही फोटोत असलेले मंत्री महाशय ओळखू येतायत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 29, 2017 12:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close