S M L

वेगळ्या विदर्भाचा सध्या विचार नाही-अमित शहा

परिवारवाद आणि वशिलेबाजी आमच्या काळात समूळ नष्ट झाली, असं म्हणत त्यांनी विरोधकांना टोलाही लगावला

Sachin Salve | Updated On: May 26, 2017 06:11 PM IST

वेगळ्या विदर्भाचा सध्या विचार नाही-अमित शहा

26 मे : वेगळ्या विदर्भाचा सध्या विचार नाही असं वक्तव्य भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केलंय.

आज मोदी सरकारला 3 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने भाजप अध्यक्ष अमित शहांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. यावेळी त्यांनी तीन वर्षातील कामाचा पाढा वाचला.  या 3 वर्षांत भारतीयांचा आत्मविश्वास वाढला, भ्रष्टाचार कमी झाला आणि जगात भारताची प्रतिमा उंचावलीय, असा दावा शहांनी केला.

परिवारवाद आणि वशिलेबाजी आमच्या काळात समूळ नष्ट झाली, असं म्हणत त्यांनी विरोधकांना टोलाही लगावला. त्यानंतर मग त्यांनी सरकारच्या योजना आणि कामांचा नेहमीचा पाढा वाचला. यावेळी पत्रकारांनी वेगळ्या राज्याबद्दल प्रश्न विचारला असता, सध्या वेगळ्या विदर्भाचा विचार नाही असं सांगत छोट्या राज्याची भूमिका कायम असल्याचं अधोरेखित केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 26, 2017 06:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close