S M L

म्यानमार सीमेवर नागा दहशतवाद्यांचा खात्मा, भारतीय लष्कराची धडक कारवाई

भारतीय लष्कराने म्यानमारच्या सीमा भागातल्या नागा दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला केलाय. त्यात अनेक उग्रवादी ठार झाल्याची माहिती मिळतेय. एनएससीएन अर्थात खापलांग या नागा संघटनेच्या उग्रवाद्यांचा हा तळ होता. म्यानमान सीमाभागातील लांग्खू गावात लष्कराने ही धडक कारवाई केलीय.

Chandrakant Funde | Updated On: Sep 27, 2017 04:05 PM IST

म्यानमार सीमेवर नागा दहशतवाद्यांचा खात्मा, भारतीय लष्कराची धडक कारवाई

27 सप्टेंबर : भारतीय लष्कराने म्यानमारच्या सीमा भागातल्या नागा दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला केलाय. त्यात अनेक उग्रवादी ठार झाल्याची माहिती मिळतेय. एनएससीएन अर्थात खापलांग या नागा संघटनेच्या उग्रवाद्यांचा हा तळ होता. म्यानमान सीमाभागातील लांग्खू गावात लष्कराने ही धडक कारवाई केलीय.

म्यानमार सीमाभागात याच नागा उग्रवाद्यांकडून भारतीय जवानांवर गोळीबार केला त्याला प्रत्युत्तर म्हणून लष्कराकडून ही कारवाई करण्यात आलीय त्यात 70 हून अधिक सैनिक सहभागी झाले होते. यापूर्वी 2015सालीही लष्कराने नागा बंडखोरांवर अशाच पद्धतीने कारवाई केली होती. त्यानंतर आज पुन्हा लष्कराने नागा उग्रवाद्यांना ठार केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 27, 2017 03:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close