S M L

राहुल गांधींनी गरिबांच्या जखमेवर अ‍ॅसिड ओतले -मोदी

Sachin Salve | Updated On: Sep 7, 2013 10:48 PM IST

राहुल गांधींनी गरिबांच्या जखमेवर अ‍ॅसिड ओतले -मोदी

modi on rahul07 सप्टेंबर : गरिबी ही मनाची स्थिती आहे असं म्हणणार्‍या राहुल गांधी यांनी गरिबांची थट्टा करू नये, त्यांनी गरिबांच्या जखमेवर ऍसिड टाकण्याचं काम केलं आहे, गरिबांच्या जखमांवर मलम लावण्याऐवजी त्यांनी जखमेवरच बोट ठेवलंय.

 

तरी यांना याचा खेद नाही कारण काँग्रेस पक्ष हा अंहकारात बु़डालेला आहे अशी टीका भाजपचे प्रचारप्रमुख आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली. तसंच  इंदिरा गांधी यांनी गरिबी हटावचा नारा दिला आणि काँग्रेस ज्यांच्या खांद्यावर जबाबदारी दिलीय तेच गरिबांची थट्टा उडवताय असा टोलाही मोदी यांनी लगावला.

 

नरेंद्र मोदी छत्तीसगडमध्ये अंबिकापूर इथं मुख्यमंत्री डॉ.रमन सिंह यांच्या विकास यात्रेच्या समारोप सभेत बोलत होते. या सभेत त्यांनी काँग्रेस, पंतप्रधान मनमोहन सिंग आणि राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली.

 

काँग्रेसने तेलगणा स्वतंत्र राज्य करून शेजारी आंध्रामध्ये आग लावलीय. भाजपच्या काळात छत्तीसगड आणि उत्तराखंड वेगळे राज्य करण्याचा निर्णय झाला तेंव्हा दोन्ही राज्यातील लोकांनी मिठाई वाटली पण तेलंगणा वेगळं राज्य झालं तर संचारबंदी लागू करावी लागली. काँग्रेसने सोन्याला हात लावला तर माती होते अशी टीका मोदींनी केली.

 

तसंच त्यांनी रमन सिंह यांची थेट पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याशी तुलना केली. मनमोहन सिंग 10 वर्षांपासून देशाचे पंतप्रधान आहे तर रमन सिंह हे छत्तीसगडचे 10 वर्षांपासून मुख्यमंत्री आहे पण तरीही रमन सिंह हे पंतप्रधानावर भारी आहे अशी तुलनाच मोदींनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 7, 2013 09:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close