S M L

राहुल गांधी पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार -PM

Sachin Salve | Updated On: Sep 7, 2013 10:58 PM IST

Image img_234652_pmandrahulgandhi_240x180.jpg07 सप्टेंबर : राहुल गांधी पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार असल्याचं पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी स्पष्ट केलंय. 2014 मध्ये होणार्‍या निवडणुकीत राहुल गांधी पंतप्रधान झाले तर मला आनंदच होईल. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काम करायला मला आवडेल असंही ते म्हणाले.

 

जी20 समिटवरुन परतत असताना पंतप्रधानांनी ही प्रतिक्रिया दिली. पंतप्रधानांच्या या स्पष्ट भूमिकेमुळे तिसर्‍या टर्मसाठी मनमोहन सिंग इच्छुक नसल्याचे त्यांनीच स्पष्ट संकेत दिलेत. या अगोदरही मनमोहन सिंग यांनी राहुल गांधींचं कौतुक केलं होतं.

 

तर दुसरीकडे भाजपच्या गोटात नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. संघानेही आपला पाठिंबा मोदींना दिलाय. त्यामुळे येणार्‍या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 7, 2013 09:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close