S M L

वर्ध्यातल्या सेवाग्राम आश्रमात अहिंसा दिन साजरा

30 जानेवारी, वर्धानरेंद्र मतगांधीजींची 60 वी पुण्यतिथी संपूर्ण देशात साजरी झाली. गांधीजींच्या वर्ध्यातल्या सेवाग्राम आश्रमात आजही शांततेचा आणि एकतेचा संदेश दिला जातो. हजारो पर्यटक इथे येतात. आणि इथून गांधीजींनी सांगितलेला संदेश घेऊन जातात. कुसुमताई गांधीजींच्या विचारांचा संदेश देण्याचं काम आनंदानं करत आहेत. कुसुमताई मुळच्या छत्तीसगड मधल्या त्या रहिवाशी आहेत . कुसुमताईंनी 1945 मध्ये नई तालीम या शाळेत प्रवेश घेतला .इथे त्यांनी गांधीजींच्या तत्त्वज्ञानाचे धडे घेत स्वातंत्र्य चळवळीत झोकून दिलं. आज त्या सेवाग्राम आश्रमाच्या दर्शनार्थि म्हणून जवाबदारी सांभाळतात. प्रांतिक आणि भाषावाद ही देशाला लागलेली कीड आहे असं त्यांचं म्हणंणं आहे. विविध भाषा आणि प्रांतांनी नटलेल्या देशाला एकसंघ ठेवण्याचं कार्य आज अनेकजण करतायात. स्थानिकांसोबतच परप्रांतातील नागरिक सेवाग्रमा आश्रमात प्रेरणा घेण्यासाठी येतात. इथुन सगळ्यांना एकतेच्या प्रसाराचं काम करण्यास बळ मिळतं. जगात दहशतवाद ,भाषावाद जोर धरत असताना गांधीजींचे अहिंसेचे विचार इथं रुजवले जात आहेत. वर्ध्याच्या कर्मभूमीत बापूंच्या तत्त्वज्ञानाचं बीज रोवलं जातंय. गांधीजींचे विचार अंगिकारणे हीच त्यांना खरी आदरांजली असेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 30, 2009 03:37 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 30, 2009 03:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close