S M L

मुझफ्फरनगर हिंसाचारात मृतांचा आकडा 32 वर

Sachin Salve | Updated On: Sep 10, 2013 04:09 PM IST

मुझफ्फरनगर हिंसाचारात मृतांचा आकडा 32 वर

muzafarnagar roits10 सप्टेंबर : उत्तर प्रदेशातल्या मुझफ्फरनगर हिंसाचारात मृतांचा आकडा 32 वर पोहचला आहे. क्षुल्लक कारणावरून पेटलेल्या जातीय दंगलीचा वणवा अजूनही पेटलेले आहे. मुझफ्फरनगरमध्ये अजूनही संचारबंदी लागू आहे.

 

सर्व बाजार आणि दुकानं बंद आहेत. लष्कराचे आणि निमलष्करी दलाचे जवान तैनात आहेत. पोलिसांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आतापर्यंत पोलिसांनी एक हजारांहून अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केलाय. तर 90 जणांना अटक करण्यात आलीये.

 

दंगल टाळता आली असती?

- छेडछाडप्रकरणातून झालेल्या हत्येच्या आरोपींना लवकरात लवकर अटक करा, अशी मागणी 31 ऑगस्ट रोजी पंचायतीत करण्यात आली.

- 31 ऑगस्टला काढलेल्या रॅलीत 7 सप्टेंबरला महापंचायत घेणार असल्याची घोषणा करण्यात आली. म्हणजे सरकारकडे कारवाईसाठी पूर्ण एक आठवडा होता.

- शिवाय प्रतिबंधात्मक आदेश लागू असतानाही 7 सप्टेंबरच्या महापंचायतीसाठी हजारोच्या संख्येनं लोक कसे गोळा झाले. याप्रकरणी 90 लोकांना अटक करण्यात आलीय तर भाजपच्या 4 आमदारांवर गुन्हेही नोंदवण्यात आलेत.

तणाव निवळण्यासाठी खुद्द पंतप्रधानांनी यूपीला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलंय. तर यूपीच्या राज्यपालांनी राज्य सरकारला धारेवर धरणारा अहवाल केंद्राला पाठवलाय. तिकडे दंगलग्रस्त भागाला भेट देणारे भाजपचे रविशंकर प्रसाद आणि इतर नेत्यांना गाझियाबादच्या सीमेवरच अडवण्यात आलं. समाजवादी पक्ष सत्तेवर आल्यापासून संपूर्ण राज्यात एक डझनहून जास्त जातीय दंगली झाल्यायत. आता लोकसभा निवडणूक जवळ येतेय आणि केंद्रात 80 खासदार पाठवणार्‍या या राज्याला म्हणूनच अधिक महत्त्व आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 10, 2013 01:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close