S M L

'इंडियन मुजाहिद्दीनला ISI पुरवते पैसा'

Sachin Salve | Updated On: Sep 12, 2013 11:26 PM IST

bhatkal aarest12 सप्टेंबर : इंडियन मुजाहिद्दीनचा संस्थापक अतिरेकी यासीन भटकळच्या चौकशीतून धक्कादायक खुलासा झालाय. भटकळच्या चौकशी अहवालातले महत्त्वाचे मुद्दे सीएनएन-आयबीएनच्या हाती लागलेत. इंडियन मुजाहिद्दीनला पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा असलेल्या आयएसआयकडूनच सर्व निधी पुरवला जातो, तसंच IMचं ISI यच व्यवस्थापनही बघते अशी कबुली भटकळनं दिलीय.

 

या अगोदरही पाकिस्तान गुप्तचर यंत्रणेनं आरोप करण्यात आले होते मात्र नेहमी प्रमाणे पाकने सर्व आरोप फेटाळून लावले. आता अटकेत असलेल्या भटकळने कबुली दिलीय. 2007 पासून भारतात झालेल्या 10 मोठ्या बॉम्बस्फोटांमध्ये इंडियन मुजाहिद्दीनचा प्रत्यक्ष सहभाग असल्याची कबुलीही भटकळनं दिलीय.

 

यासीन भटकळला बिहारमधून अटक करण्यात आली. त्याची एनआयए कोठडी वाढवण्यात आलीय. त्याच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे समोर येत आहे. त्याने या अगोदर वाराणसी आणि हैदराबाद बाँम्बस्फोटात सहभाग असल्याचं कबूल केलंय. तसंच दोनच दिवसांपूर्वी त्याने मुंबईतील झवेरी बाजार साखळी स्फोट प्रकरणी चुकींच्या आरोपींना अटक करण्यात आली असा दावा केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 12, 2013 11:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close