S M L

येडियुरप्पा पुन्हा भाजपच्या वाटेवर?

Sachin Salve | Updated On: Sep 18, 2013 11:03 PM IST

Image img_123352_yediurrupa_240x180.jpg18 सप्टेंबर : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. वाय. येडियुरप्पा हे पुन्हा एकदा भाजपमध्ये परतण्याचे प्रयत्न करत असल्याचं दिसतंय. पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींना आपण पाठिंबा देऊ, असं त्यांनी म्हटलं आहे.

 

दरम्यान, येडियुरप्पा यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह आणि राज्यसभेतले विरोधी पक्षनेते अरूण जेटली यांची भेट घेण्यासाठी आपल्या विश्वासू कार्यकर्त्यांना पाठवलंय.

 

कर्नाटक जनता पक्षाचं भाजपमध्ये विलिनीकरणासाठी भाजपमध्ये मतैक्य घडवून आणण्यासाठी ते चर्चा करणार आहेत. नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा झाल्यानंतर येडियुरप्पा यांनी भाजपमध्ये परतण्याची इच्छा व्यक्त केलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 18, 2013 10:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close