S M L

पाकसोबत चर्चा होणारच-PM

Sachin Salve | Updated On: Sep 26, 2013 06:53 PM IST

Image pm_vs_bjp_300x255.jpg26 सप्टेंबर : भारत पाक चर्चेला अवघे 72 तास राहिले असताना आज जम्मूत अतिरेक्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात 12 जणांना आपला जीव गमवावा लागला. मात्र पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पाकिस्तानसोबत चर्चा सुरूच राहील, असं स्पष्ट केलंय.

 

शांततेच्या शत्रंूनी चर्चेच्या प्रक्रियेला पुन्हा एकदा खीळ घालण्याचा प्रयत्न केला असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलंय. सीमेपलीकडून प्रोत्साहन मिळत असलेल्या दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. असे हल्ले, चर्चेद्वारे प्रश्न सोडवण्याच्या सरकारच्या निर्धाराला परावृत्त करु शकत नाही असं पंतप्रधानांनी ठणकावून सांगितलं.

जम्मूमधील कथुआ आणि सांबा सेक्टरमध्ये सकाळी 6.45च्या सुमारास सैनिकांच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये 12 लोकांना जीव गमवावे लागलेत. यामध्ये 5 पोलीस आणि लष्कराच्या 3 जवानांचा समावेश आहे.

 

अतिरेक्यांनी पहिल्यांदा पोलीस स्टेशनवर हल्ला केला आणि 5 पोलिसांना आणि एका नागरिकाला ठार केलं. त्यानंतर तिथे असलेल्या बसमधल्या ड्रायव्हरला मारून त्या बसमधून ते पळून गेले. अजूनही सांबामधल्या 16 कॅव्हॅलरी या भागात अतिरेकी आणि लष्करी जवानांची चकमक सुरू आहे. यामध्ये 3 अतिरेकी ठार झालेत, अशी माहिती मिळतेय. दरम्यान शहीद पोलिसांना जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी श्रद्धांजली वाहिली.

 

पंतप्रधान मनमोहन सिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची 3 दिवसांनंतर न्यूयॉर्कमध्ये बैठक होणार आहे. ती रद्द करावी अशी मागणी आता भाजपने केलीये. पण ही चर्चा ठरल्याप्रमाणेच होईल, असं पंतप्रधानांनी स्पष्ट केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 26, 2013 06:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close