S M L

'मुस्लीम तरूणांना चुकून अटक केली असेल तर सोडून द्या'

Sachin Salve | Updated On: Sep 30, 2013 04:09 PM IST

Image shinde_300x255.jpg30 सप्टेंबर : दहशतवादी हल्ल्यात मुस्लीम तरूणांना चुकीनं अटक झाली का ते तपासून पाहा जर अशा तरूणांना अटक झाली असेल तर त्यांना नुकसान भरपाई देऊन सोडून द्या अशी सुचना केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केलीय.

 

दहशतवादी हल्ल्यांच्या प्रकरणात काही मुस्लीम तरुणांना चुकीनं पकडण्यात आल्याच्या मुद्द्यावर पत्र लिहिलंय. अलीकडेच अशी काही प्रकरणं समोर आल्यामुळे सुशीलकुमार यांनी हे पत्र लिहिल्याचं कळतंय. दहशतवादी हल्ला प्रकरणांमध्ये अल्पसंख्याक तरुणांना चुकीनं पकडलं गेलं नसल्याची खात्री करा अशा सूचना त्यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केल्या आहेत. या पत्रावरून भाजपनं सुशीलकुमार शिंदेंना फटकारलंय. सरकार व्होट बँकेचं राजकारण करत असल्याचा आरोप भाजपनं केला आहे.

 

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात दहशतवादी हल्ल्यात मुस्लीम तरुणांना चुकीनं पकडण्यात आलं असं वक्तव्य केलं होतं. तसंच इंडियन मुजाहिद्दीनचा म्होरक्या यासीन भटकळ एनआयएच्या ताब्यात आहे. भटकळने चौकशी दरम्यान, मुंबईत झवेरी बाजारमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट चुकीच्या माणसांना अटक केली ज्या तरूणांना अटक केली ती आमच्या संघटनेची माणसं नाहीच असा दावा भटकळने केला होता. या दोन्ही प्रकरणानंतर आज शिंदेंनी सर्व या सुचना केल्यात.

शिंदेंनी म्हटलंय...

"अल्पसंख्याक तरुणांना चुकीनं अटक करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांविरुद्ध कडक आणि तात्काळ कारवाई व्हावी. अशा तरुणांना तात्काळ सोडून तर दिलंच पाहिजे. शिवाय त्यांना योग्य भरपाईही देऊन मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न करावेत."

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 30, 2013 04:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close