S M L

मिशन नेव्ही शोमधून कॅडेटचा शोध सुरू

2 फेब्रुवारी रिऍलिटी शो हे झटपट प्रसिद्धी आणि पैसे कमावण्याचं एक माध्यम. पण एक असा रिऍलिटी शो येतोय, ज्यात सहभागी होणा-यांना इंडियन नेव्हीत प्रवेश मिळू शकेल. आणि महिनाभर नेव्हीच्या युद्धनौकेवरून सैरही घडेल. या रिऍलिटी शोचं नाव आहे 'मिशन नेव्ही'.इंडियन नेव्हीचे शुभ्र आणि प्रतिष्ठित युनिफॉर्म अंगावर मिरवायचा असेल, दर्यावर्दी योद्धा बनायचं असेल तर त्याआधी कुठल्या संकटांना सामोरं जावं लागेल याची माहिती कॅडेटना अगोदर असायला हवी. यासाठी उद्याच्या कॅडेसचा शोध घेत आहेत नॅशनल जिओग्राफिक चॅनेल आणि इंडियन नेव्ही एका रिऍलिटी शोमधून, या रिऍलिटी शोचं नाव आहे मिशन नेव्ही.नेव्हीत सहभागी होणं, दर्यावर्दी योद्धा बनणं म्हणजे समुद्राबरोबर रोमान्स करणं. नेव्हीकडे करिअर म्हणून पाहायचं असेल, ऑफिसर बनायचं असेल तर काय करावं लागेल याची एक पुसटशी झलक या शोमधून होणार आहे. सहजासहजी हा युनिफॉर्म मिळत नाही.त्यासाठी तुमचं शरीर आणि हृदय पोलादाचं असावं लागतं. जो बलवान तोच टिकेल. त्यासाठी प्रत्येक क्षणी अडखळणं आलं, पडणं आलं आणि झगडणंही. या शोमध्ये फक्त फिजिकल ट्रेनिंगच दिलं जाणार असं नाही तर कॅडेटच्या मानसिक क्षमतेचीही कसोटी लागणार आहे. या शोमध्ये कॅडेटचं प्लॅनिंग, वेळेचं नियोजन या सगळ्याच बाबींचा कस लागणार आहे. जे तरतील ते जिंकतील. जे हरतील ते बुडतील.या रिऍलिटी शोमध्ये देशभरातल्या 50 हजार तरुण तरुणींनी भाग घेतला आहे. ज्यापैकी फक्त 15 जणांना स्पर्धेत भाग घेता येईल. आणि या 15 पैकी फक्त 5 जणांना इंडियन नेव्हीतलं जीवन प्रत्यक्ष अनुभवता येईल. तसंच एक महिनाभर नेव्हीच्या युद्धनौकेवरचा प्रवासही. सोमवारी रात्री नऊ वाजता नॅशनल जिओग्राफिक चॅनेलवर या तरुणांचं मिशन नेव्ही हा रिऍलिटी शो सुरू होतोय आता पाहायचं या तरुणांची मिशन यशस्वी होतेय की नाही ते.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 2, 2009 08:31 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 2, 2009 08:31 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close