S M L

नक्षलवाद्यांशी लढण्यास अपुरी साधनसामुग्री

3 फेब्रुवारी, गडचिरोलीप्रशांत कोरटकरगडचिरोली जिल्ह्यातील धानोरा भागाच्या नक्षल चकमकीत 15 पोलीस शहीद झाले. या घटनेनंतर सरकारचे डोळे उघडले. आता केवळ निर्णयात वेळ न घालवता कारवाईची गरज असल्याची मागणी होत आहे.महाराष्ट्र पोलीस दलात 2006 मध्ये सामील झालेले नक्षल विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक उपेंद्र गुळदेकर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी बंदुकीतील शेवटची गोळी संपेपर्यत नक्षलवाद्यांशी मुकाबला केला. छत्तीसगड वरुन आलेल्या शंभराच्यावर नक्षलवाद्यांनी या 15 जणांचा अमानुषपणे बळी घेतला. यांना श्रध्दांजली वाहण्यास आलेल्या मुख्यमंत्र्यांनी नक्षलवाद्यांशी मुकाबला करण्याच सांगून सरकारच्या संथ कामगीरीवर पांघरुण घालण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात पोलिसंानी दोघांना ताब्यात घेतलं आहे.मरकेगावात स्मशान शांतता पसरलीय. 1 फेब्रुवारीला झालेल्या चकमकीत नक्षलवाद्यांनी किती अमानुषपणे या पोलीस शिपायांना मारले असेल, याची माहीती इथं आल्यावर समजतं. इथल्या आदिवासींनी नक्षलवादाचा इतका भयानक चेहरा याआधी बघितला नव्हता. सरकारमध्ये असणारे लोकच सरकारी पोलीस यंत्रणेवर प्रश्न उपस्थित करत आहेत.स्वतःचा जीव तळहातावर घेऊन, खांद्यावर एक बंदूक आणि अपुरा शस्त्रसाठा घेऊन इथल्या जंगलात पाऊल ठेवणारं नक्षलवाद विरोधी पथक घरचा, कुटुंबाचा, पोराबाळांचा कुठलाही विचार न करता ते सतत नक्षलावादाचा सामना करतात. पण त्यांच्या शस्त्रसाठ्याच्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष नसतं.आतापर्यतंच्या नक्षलवादी कारवायांमध्ये 105 पोलीस आणि 250 च्यावर लोकांचा हकनाक बऴी गेला आहे. रविवारच्या घटनेत शहीद झालेल्यांमध्ये तर अनेकजण 25 ते 40 वयोगटाचे आहेत. अपुरा शस्त्रसाठा आणि अद्ययावत यंत्रसामग्रीचा अभाव हेच या घटनेच कारण आहे. छत्तीसगड, आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्र ही तीनही राज्य नक्षलवादाची शिकार आहेत. दिसून आला नाही. या घटनेनंतर तरी सरकार काही कठोर पावलं उचलणार का, असा शहिदांच्या कुटुंबियांचा सरकारला सवाल आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 3, 2009 06:44 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 3, 2009 06:44 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close