S M L

आता मतदारांना पोचपावतीही मिळणार !

Sachin Salve | Updated On: Oct 8, 2013 11:02 PM IST

आता मतदारांना पोचपावतीही मिळणार !

election 3423408 ऑक्टोबर : तुम्ही मतदान करायला जाता तेंव्हा तुमच्या हाताच्या बोटावर निळी शाई लावली जाते आपण मतदान केलं ही त्याची ओळख पण आता मतदान केल्याची पोचपावतीही मिळणार आहे. मतदान प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी मतदारांना पोचपावती द्यावी, असा आदेश सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिला आहे.

 

भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी याबाबत एक जनहित याचिका दाखल केली होती. आज त्यावर सुनावणी झाली यावेळी कोर्टाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या याचिकेत व्होटिंग मशिन्स पारदर्शक नसल्यानं मतदारांना सोबत पोचपावतीही द्यावी, अशी मागणी त्यांनी केली होती.

 

त्यावर येत्या लोकसभा निवडणुकीत टप्प्याटप्प्याने ही नवी पद्धत अमलात आणावी असा निर्णय सरन्यायाधीश पी. सदासिवम यांच्या खंडपीठानं दिलाय. यामुळे बोगस मतदान, व्होटिंग मशीनमध्ये फेरफार करून मतदान वाढवणार्‍या प्रकारावर आळा बसेल. विशेष म्हणजे या मागिल महिन्यात मतदारांना नकाराधिकार देण्यात यावा यासाठी एव्हीएम मशीनमध्ये ज्याला मतदान करायचे नाही असं बटन तयार करावे असा निर्णयही कोर्टाने दिला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 8, 2013 10:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close